‘माळेगाव’ निवडणुकीसाठी आज ठरणार अंतिम लढत

‘माळेगाव’ निवडणुकीसाठी
आज ठरणार अंतिम लढत
Published on

माळेगाव, ता. ११ः माळेगाव (ता.बारामती) कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोचली आहे. अर्ज माघारी घेण्याचा गुरुवारी (ता. १२) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणूक रिंगणात ते कायम राहतात की माघार घेतात, याकडे लक्ष लागले आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिकाही स्पष्ट होणार आहे. या प्रक्रियेत सत्ताधारी विरुद्ध पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यात तडजोड होते की फाटी आखून लढत होते, हे निश्‍चित होणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना यंदाच्या पंच वार्षिक निवडणुकीत ५९३ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २९ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारअखेर मागे घेतले. उर्वरित उमेदवारी अर्जांत अजित पवार यांचा `ब` वर्ग संस्था मतदार संघातून अर्ज अद्याप कायम आहे. या मतदार संघातून मात्र १३ इच्छुकांनी आपले अर्ज आजवर मागे घेतले. उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत किती पॅनेल रणांगणात उतरतात, हे स्पष्ट होणार आहे.
ब वर्ग संस्था मतदार संघातील १३ इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये दत्तात्रेय गवारे, अशोक जगताप, प्रकाश तावरे, बाळासाहेब तावरे, वीरेंद्र तावरे, सतीश तावरे, शरदचंद्र तुपे, उदयसिंह देवकाते, यशवंत देवकाते, कुंडलिक शिर्के, अजित जगताप, केशवराव जगताप, संजय निकम आदींनी माघार घेतली. माळेगाव गटातून विश्वनाथ बुरुंगले, भालचंद्र येळे , पणदरे गटातून नितीन मुळीक व विलास जगताप, खांडज-शिरवली गटातून प्रतापसिंह पवार, बापू पडर, तर नीरावागजमधून यशवंत देवकाते व शंकर झिटे, बारामती गटातून अमर घाडगे व संतोष गावडे, महिला राखीव गटामधून चैत्राली गावडे, सुलाबाई वायाळ, विद्या येळे, भटक्या विमुक्त जाती व जमातीमधून बाळकृष्ण वायाळ व भालचंद्र येळे व इतर मागास प्रवर्गातून नंदकुमार खुंटाळेंचा अर्ज मागे आला.

गुरुवारी (ता. १२) अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. तसेच, संबंधित उमेदवारांना शुक्रवारी १३ जून रोजी चिन्हे वाटप होणार आहे. त्यानुसार मतदान रविवार (ता. २२) रोजी होणार आहे, तर मतमोजणी बुधवारी (ता. २४) रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com