बहुउद्देशीय सभागृहासाठी १० कोटी
माळेगाव, ता.१२ः बारामती तालुक्यातील माळेगावला वैभवशाली ऐतिहासिक वारसा आहे. येथील गावाची वेस, भव्य वाडे, मंदिरे गतकाळातील समृद्ध वारशाची साक्ष देतात. या वास्तूवैभवात सुमारे १० कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या क्रीडा संकुलामधील बहुउद्देशीय सभागृहाची भर पडणार आहे. त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (ता.१२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांसह क्रीडा प्रेमींनी टाळ्यांच्या गजरात या प्रकल्पाचे स्वागत केले.
माळेगाव बुद्रुक येथे तब्बल ११ एकर क्षेत्रात तालुकास्तरीय क्रीडा संकुल या आगोदरच कार्यरत झाले आहे. त्यामध्ये बहुउद्देशीय सभागृहाची आवश्यकता असल्याची बाब माजी सरपंच दीपक तावरे यांनी गतवर्षी पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सदर बहुउद्देशीय सभागृहासाठी शासनस्तरावर सुमारे १० कोटी रुपये नुकतेच मंजूर केले आहेत. यामध्ये इनडोअर खेळाच्या सर्व क्रीडा बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये आगामी काळात तायक्वांदो, जुडो, कुस्ती, कबड्डी, कराटे, बॅडमिंटन यासारख्या खेळांच्या स्पर्धा या हॉलमध्ये होतील. त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रमास महत्त्व प्राप्त झाले होते. या भूमीपूजन कार्यक्रमानिमित्ताने पवार यांनी येथील क्रिकेट प्रॅक्टिस नेटचे देखील उद्घाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, क्रीडा संकुल समिती सदस्य दीपक तावरे, माळेगावचे संचालक शिवराज जाधवराव, माजी सरपंच जयदीप तावरे, अॅड. राहुल तावरे, प्रा. लक्ष्मण भोसले, विलास तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे म्हणाले की, माळेगाव येथे तब्बल ११ एकर क्षेत्रात उभारलेल्या तालुकास्तरीय क्रीडा संकुलामध्ये विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर मोठा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये बहुउद्देशीय सभागृहासाठी सुमारे १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जेची दहा मीटर, पंचवीस मीटर व पन्नास मीटर शूटिंग रेंजची क्रीडा साधणे, तसेच अद्ययावत व्यायामशाळा आदी कामे होणार आहेत.
02827
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.