कार्यक्षेत्रात १० लाख टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट

कार्यक्षेत्रात १० लाख टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट

Published on

माळेगाव, ता.१६ः उसाच्या बाबतीत गेटकेनमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे ठरले. त्यासाठी संचालक नितीन सातव यांच्या सोळा जणांच्या समितीने कार्यक्षेत्रात १० टनापर्यंत उसाचे उत्पादन वाढविण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी दिली.


माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची शुक्रवारी (ता. १५) बैठकी पार पडली. कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर मागील दीड महिन्यांपासून त्यांच्या अधिपत्याखाली कारखान्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याबाबत कोकरे म्हणाल्या की, माळेगावच्या प्रशासनाने आगामी ऊस गळीत हंगामामध्ये अधिकाधिक गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार माळेगावमध्ये शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी समितीची स्थापना संचालक नितीन सातव यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. या समितीने सभासदांच्या शिवारात एकरी १० टन उसाचे उत्पन्न अधिकचे वाढविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच त्या समितीने कार्यक्षेत्रात जास्तीचे तीन हजार एकर उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. याशिवाय कारखाना कार्यस्थळावर ऊस बेणे मळा निर्माण करणे, क्षारपड जमिनीचे प्रमाण कमी करण्यासाठी श्री दत्त शिरोळ कारखान्याचा सब सरफेड ड्रेनेज पॅटर्न राबविण्यासाठी अभ्यास करणे, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रासह गन्ना मास्टर ऊस रोपवाटिका- कांरदवाडी येथे भेट देणे आदी कामे हाती घेतली आहेत.
शाश्वत ऊस उत्पादन वाढ समितीमधील सदस्यांची नावे पुढील प्रमाणे : नितीन सातव (अध्यक्ष), योगेश जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, स्वप्नील जगताप, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, अशोक पाटील, सुरेश काळे, संदीप जगदाळे, सोहेल देवकाते, प्रणीत निंबाळकर, सौरभ कोकरे, प्रज्वल धुमाळ, ऊस विकास विभाग, ऋतिक आटोळे.
02848

Marathi News Esakal
www.esakal.com