माळेगावात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी

माळेगावात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी

Published on

माळेगाव, ता. ६ ः माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे पदवीधर मतदान नोंदणीचा उपक्रम राबविला जात आहे. लोकशाही बळकट होण्याच्या उद्देशाने आणि जास्तीत जास्त पदवीधरांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा उपक्रम राबविला जाकत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली.
बारामती, माळेगाव परिसरात पदवीधर मतदान नोंदणी प्रक्रियेला संभाव्य पदवीधर मतदारांनी प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभाग पदवीधर निवडणूक सन २०२६ साठी पदवीधर मतदान नोंदणीचा उपक्रम राबविला जात आहे. येथील कार्यकर्ते रविराज तावरे (लाखे) मित्र मंडळाने याकामी पुढाकार घेतला आहे. विशेषतः माळेगाव व परिसरातील गावांतून सुमारे ५००० पदवीधरांची मतदान नोंदणी नव्याने करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, तावरे म्हणाले की, ‘‘सहा वर्षांपूर्वी ज्या पदवीधरांनी नोंदणी केलेली होती ती सर्व प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे त्यांनाही नव्याने पदवीधर मतदार नोंदणी करावी लागणार आहे. त्या कामी यापुढील काळात जनजागृतीही केली जाणार आहे.’’
यावेळी कार्याध्यक्ष धनवान वदक, माजी सभापती अविनाश गोफणे, माजी सभापती संजय भोसले, माळेगाव कारखान्याचे संचालक राजेंद्र बुरुंगले, शिवराज जाधवराव, विशाल केशवराव जगताप, अविनाश तावरे, बनसोडे, अमित तावरे, कुलदीप तावरे, वैभव भोसले, मुरली खरात, प्रदीप जाधव, हर्षल पवार, शहाजी गोफणे, प्रवीण वाघमोडे, जगू सोलंकर, दीपक खंडाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com