शारदानगरच्या नीलमचा विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरव

शारदानगरच्या नीलमचा विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरव

Published on

माळेगाव, ता. १५ ः शारदानगर (ता. बारामती) येथील विद्यार्थिनी नीलम दिलीप वराळे हिला नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षेत सर्वोच्च गुणवत्तेसाठीचे सुवर्णपदक बहाल केले. पुणे विद्यापीठात १२६व्या पदवी प्रदान समारंभात प्रो. टी. एस. महाबळे सुवर्णपदकाने नीलम हिला सन्मानित केले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी नीलम हिने शैक्षणिक वर्ष सन २०२२- २३ मधील परीक्षेत सर्वाधिक ९२.३ टक्के गुणांसह ‘ओ’ ग्रेड व विशेष प्रावीण्य मिळविले होते. कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, मंत्री चंद्रकांत पाटील, नॅक नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत नीलमला सुवर्णपदक बहाल केले.

नीलमने शारदानगर वसतिगृहात राहून अकरावीपासून ते एम. एस्सीपर्यंतचे (वनस्पतिशास्त्र) शिक्षण घेतले. वनस्पतिशास्त्र विभागातील पहिल्याच पदव्युत्तर बॅचची विद्यार्थिनी नीलमचे यश शारदाबाई पवार महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे, असे मत प्रा. आर. बी. देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी, मानव संसाधन अधिकारी गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी तिचे अभिनंदन केले.

विद्यापीठाकडून सहाव्यांदा गौरव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आजवर सर्वोच्च गुणवत्तेसाठीचे शारदानगर येथील सहा विद्यार्थिनींना सुवर्ण पदक बहाल केल्याची नोंद आहे. त्यामध्ये सन १९९७ - ९८ साली कला शाखेतील भूगोल विषयाची अश्विनी सामंत, सन २००४-०५ साली विज्ञान शाखेतील वनस्पतिशास्त्र विषयाची जया हरद्वानी, सन २०१६-१७ साली वाणिज्य शाखेतील दीपाली मांजरे, सन १९९९-२००० साली ऊर्मिला तावरे, सन २००२-०३ मध्ये माया गावडे आणि यावेळी नीलम वराळे या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

02923

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com