विकासकामांत अडथळा आणणारे रडारवर

विकासकामांत अडथळा आणणारे रडारवर

Published on

माळेगाव, ता. १ : पणदरे (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. १) पार पडलेल्या ग्रामसभेत शासनस्तरावर मंजूर झालेल्या विकासकामांना गती देण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच त्या विकास कामात नाहक अडथळा आणणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे, अशी माहिती सरपंच अजय सोनवणे, उपसरपंच निखिल गायकवाड यांनी दिली.

पणदरे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांची विविध विकास कामे गतवर्षापासून मंजूर आहेत, परंतु गावच्या राजकीय वादातून अनेक मूलभूत प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. १) झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी रस्ते, दिवाबत्ती, पाण्याच्या सुविधा व सांडपाण्याच्या व्यवस्थेसह विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्याचा ठराव मंजूर झाला. गावाच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या घटकांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरल्याची माहिती सांगण्यात आली. दरम्यान, पणदरे गावाच्या विकासाचा रोडमॅप ठरविताना सर्व घटकांनी सहयोगी भूमिका बजावली पाहिजे, या पुढील काळात विकास योजनांची अंमलबजावणी जलद होण्याची अपेक्षा आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांची एकसूत्रता महत्त्वाची आहे. ‘गावाचा विकास हा सर्वांचा ध्यास’, असा संदेश या ग्रामसभेतून सरपंच जगताप यांनी दिला. यावेळी ग्रामसभेत ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com