शारदानगरला प्रशस्त रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी टळली
माळेगाव, ता.१८ : शारदानगर (ता. बारामती) हद्दीतील राज्यमार्ग व सेवा रस्ता प्रशस्त झाल्याने रविवारी (ता.१८) कृषिक प्रदर्शनानिमित्ताने शेतकरी तसेच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. वाहतूक कोंडी विचारात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळीच शासनस्तरावर येथील मुख्य रस्ते प्रशस्त केले होते. त्यामुळे यंदाच्या कृषिक प्रदर्शनात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना काहीसे सोईचे झाले.
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, हरियाना आदी राज्यांतून शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिसून आले. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. विशेषतः प्रशस्त रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यात पोलिसांना यश आले. प्रशस्त रस्त्यांसह वाहनांचे पार्किंग, वळणमार्ग तसेच आपत्कालीन सेवांना मोकळा मार्ग मिळाल्याने संपूर्ण दिवसात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.
दरम्यान, पूर्वी कृषी प्रदर्शनाच्या परिसरात रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या होती. त्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकाच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता, दिवाबत्ती आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने शारदानगर येथील रस्ते बांधणीचे काम वेळेत उरकले. परिणामी राज्यमार्ग व सेवा रस्ता प्रशस्त झाल्याने वाहनांची ये-जा सुरळीत सुरू राहिली. याकामी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, कार्यकारी अभियंता अमोल पवार, सुभाष पाटील, महावितरण कंपनीचे अधिकारी जांबले, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, सीईओ नीलेश नलावडे आदींनी योगदान दिल्याचे सांगण्यात आले.
03055
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

