माळेगाव कृषी प्रदर्शनात श्वान स्पर्धेमुळे रंगत
माळेगाव, ता. १९ : कृषी प्रदर्शनात आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते पश्मी व कारवान या नामांकित जातींच्या श्वानांच्या स्पर्धेमुळे रंगत आली. या स्पर्धेला श्वानप्रेमी शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील विजेत्यांना अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त रणजित पवार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. रतन जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी निवड समितीमध्ये डॉ. बी. एन. आंबोरे, डॉ. ए. व्ही. खानविलकर, डॉ. टी. सी. शेंडे (पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ) तसेच तेजस कळमकर (पुणे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून ५१ विविध जातींच्या श्वान मालकांनी सहभाग नोंदविला. श्वानांची शारीरिक ठेवण, आरोग्य, चालढाल, शिस्त आणि जातीचे वैशिष्ट्य या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते व बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे :
१) पश्मी ब्रीड (Adult Female)
प्रथम क्रमांक : सागर जामदार, बारामती (५,००० व ट्रॉफी)
द्वितीय क्रमांक : बापू गोफणे, सोमंथळी, ता. फलटण (३,००० व ट्रॉफी)
तृतीय क्रमांक : समाधान वरी, पंढरपूर (२,००० व ट्रॉफी)
२) पश्मी ब्रीड (Adult Male)
प्रथम क्रमांक : सचिन मुळे, सांगली (५,००० व ट्रॉफी)
द्वितीय क्रमांक : धनंजय महामुलकर, फलटण (३,००० व ट्रॉफी)
तृतीय क्रमांक : अमोल करपे, बीड (२,००० व ट्रॉफी)
३) कारवान ब्रीड (Adult Female)
प्रथम क्रमांक : प्रमोद साळुंखे, मिरज (५,००० व ट्रॉफी)
द्वितीय क्रमांक : सुयोग शिंदे, बारामती (३,००० व ट्रॉफी)
तृतीय क्रमांक : धनराज खरात, बारामती (२,००० व ट्रॉफी)
४) कारवान ब्रीड (Adult Male)
प्रथम क्रमांक : सुरज पाटील, मिरज (५,००० व ट्रॉफी)
द्वितीय क्रमांक : कृष्णा शिंदे, मेडद, ता. बारामती (३,००० व ट्रॉफी)
तृतीय क्रमांक : विश्वजित पवार, शारदानगर, बारामती (२,००० व ट्रॉफी).
03063
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

