उधारीवर सिगारेट न दिल्याने चौघांवर कोयत्याने हल्ला
माळेगाव, ता. २१ : सांगवी (ता. बारामती) येथे उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग मनात धरून चौघांनी पान टपरी व्यावसायिक व त्यांच्या नातेवाइकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी (ता.२०) सांगवी येथील एसटी बस स्थानक येथे ही धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत प्रतीक सुनील जगताप, सुनील जयसिंग जगताप, सार्थक सुनील जगताप, उषा मानसिंग जगताप (रा. सांगवी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी प्रतीक सुनील जगताप (वय २४) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे, त्यानुसार पोलिसांनी उपलब्ध फिर्याद व वैद्यकीय अहवालाच्या आधारे अभिषेक महादेव जगताप, महादेव विश्वनाथ जगताप, गीता महादेव जगताप, काजल महादेव जगताप (रा. सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक फौजदार मोहिते करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

