शिक्षक विकास कार्यक्रमाला माळेगावात प्रतिसाद
माळेगाव, ता. २७ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी (अटल) पुरस्कृत शिक्षक विकास कार्यक्रम आज यशस्वीपणे पार पडला. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीआय) अंतर्गत असलेला हा कार्यक्रम ‘शहरी व सामाजिक लवचिकतेसाठी शाश्वत पायाभूत सुविधांची उभारणी- आव्हाने आणि भविष्यातील मार्ग’ या विषयावर आधारित होता. शिक्षकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्रकुमार मुकणे यांनी दिली. दरम्यान, माळेगाव येथे शिक्षक विकास कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. तारेंद्र लाखनकर यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्याख्यान दिले. या उपक्रमाचे समन्वयक डॉ. गुणवंत काटे, सह समन्वयक डॉ. श्रीकांत बोबडे यांनी नियोजन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी शिक्षकांना या कार्यशाळेचा फायदा झाल्याचे सांगितले. समारोप प्रसंगी मूल्यांकनानंतर सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

