वळणे येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत

वळणे येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत

माले, ता. ३ : मुळशी धरण भागातील वळणे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी अंजना जयवंत सातपुते व रोहिणी राजेंद्र सोंडकर या एकमेकींच्‍या विरोधात या रिंगणात उतरल्‍या आहेत. त्‍याबरोबर प्रभाग क्रमांक तीनमधून सदस्‍यपदाच्‍या एका जागेसाठी शीतल देविदास झोरे व नीता संदीप भावेकर या दोन उमेदवार यांच्‍यात लढत होणार आहे.
वळणे येथे सदस्यपदाच्‍या सहा जागा बिनविरोध झाल्‍या असून, सदस्‍यपदी भगवान सुभाष सातपुते, करिष्मा रोशन सोंडकर, आशा जयवंत भोसले, अमित गौतम भोसले, अश्विनी निवृत्‍ती सातपुते, चेतन ईश्‍वर भोसले यांची बिनविरोध निवड झाली.
दुर्गम ग्रामीण भागात साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा, तसेच दबाव तंत्राचा वापर होण्‍याची शक्‍यता असल्‍याने प्रशासनाने सजग राहण्‍याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com