संभवे येथे सदस्य ठरवणार सत्ताधारी

संभवे येथे सदस्य ठरवणार सत्ताधारी

Published on

माले, ता. ३ : मुळशी धरणाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या संभवे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकीत तीन सदस्‍यांची बिनविरोध निवड झाली, तर तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. सरपंच पद व एक सदस्‍यपदाची जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत होते. परंतु, त्यासाठी गावात उमेदवारच न मिळाल्‍याने दोन्‍ही पद रिक्‍त राहणार आहे.
सदस्‍यपदी प्रशांत प्रकाश जोरी, निलम हनुमंत जोरी, कांचन नीलेश जोरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक लागलेल्‍या प्रभाग क्रमांक दोनमध्‍ये काजल प्रकाश जाधव विरुद्ध पुनम राहुल जाधव,
तर प्रभाग क्रमांक तीनमध्‍ये संजय ज्ञानदेव जोरी विरुद्ध नवनाथ शंकर जोरी, दीपाली संजय जोरी विरुद्ध अनिता राजेंद्र जोरी यांच्‍यात लढत होणार आहे.
भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल विरुद्ध भैरवनाथ परिवर्तन पॅनेल अशी लढत होणार आहे. सरपंचपद रिक्‍त राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त सदस्‍य निवडून आल्‍यास उपसरपंचपद व प्रभारी सरपंच पदाच्‍या माध्‍यमातून गावचा कारभार हाकण्‍याची संधी मिळणार आहे. त्‍यामुळे दोन्‍ही पॅनेलच्‍यावतीने सदस्‍यांच्‍या बहुमतावर लक्ष केंद्रित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.