एकोले येथील धबधब्यामध्ये पर्यटकाचा बुडून मृत्यू
माले, ता. ४ ः मुळशी धरण परिसरातील एकोले-भांबर्डे (ता.मुळशी) गावांच्या हद्दीवर असणाऱ्या लोटस पॉइंट येथील धबधब्याच्या कुंडात हातपाय धुताना घसरून पडल्याने पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. सोमवार (ता.३) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
शिवम सुनील काशीद (वय १९, रा. धनकवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मयत युवकाचे वडील सुनील पांडुरंग काशीद (वय-६०, रा. धनकवडी, पुणे) यांनी पोलिसांनी माहिती दिली.
सोमवारी (ता.३) शिवम व त्याचे दोन मित्र फिरण्यासाठी पुणे येथून मुळशीतील एकोले-भांबर्डे येथील लोटस पॉइंट धबधब्याच्या परिसरात आले होते. दुपारी बारा वाजता शिवम हा धबधब्याच्या कडेला हातपाय धुण्यासाठी गेला. परंतु, तो पाय घसरून पाण्यात पडला. शिवमला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्याबरोबर मित्रांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे
त्याच्या मित्रांनी ग्रामस्थ, पोलिस, नातेवाइकांना माहिती देऊन मदत मागवली.
पौड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पाटील, लोणावळा येथील शिवदुर्गचे रेस्क्यू टीमने शिवमचा मृतदेह शोधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.