

माले, ता. ११ : मुळशी धरण भागातील ढोकळवाडी (ता. मुळशी) येथे जमिनीमध्ये शेड बांधण्याच्या वादातून पुतण्याने चुलत्यावर बंदुकीने गोळीबार केला. बंदुकीतून निघालेल्या छऱ्यांमुळे गंभीर जखमी झालेल्या चुलत्याच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात करणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (ता. ६) हा प्रकार घडला.
या घटनेत सोपान चिंधू ढोकळे (वय ५२, रा. ढोकळवाडी) हे जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी नवनाथ नामदेव ढोकळे (रा. ढोकळवाडी) यास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोपान ढोकळे यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराजवळ शेतामध्ये शेड बांधण्याकरीता पायाचे बांधकाम केले आहे. त्याचा राग मनात धरून रविवार आरोपी नवनाथ ढोकळे याने सोपान ढोकळे यांच्या चेहऱ्याच्या दिशेने बंदुकीने गोळीबार केला. बंदुकीतून निघालेल्या छऱ्यांमुळे सोपान यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली. त्यानंतर नवनाथ याने त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी नवनाथ यास अटक केली. सोपान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.