निवे येथील रस्ता चिखलमय
माले, ता.२७ : निवे (ता.मुळशी) येथील परातेवस्तीजवळ रस्त्याला लागून असलेल्या डोंगराळ जमिनीत गेल्या काही महिन्यांपासून जमिनीचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मोकळी झालेली माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्यावर येत राडारोडा, चिखल सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर येत अडथळा होत आहे. यामुळे ग्रामस्थांना नाहक मनस्ताप होत आहे.
पाऊस सुरू झाल्याने पुणे ताम्हिणी कोलाड मार्गावरून धरणभागातील अंधारबन, पिंपरी, वांद्रे, वडुस्ते, अहिरवाडी, गोठा, बार्पे, तिस्करी, एकोले व्हॅली, घनगड, भांबर्डे, आंबवणे, लोणावळा भागात फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले आहे. ग्रामस्थांसोबत पर्यटकांच्या वाहनांनाही चिखलातून मार्ग काढावा लागतोय. दुचाकीचालकांना चिखलातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहने म्हणाले की, ‘‘परातेवस्ती येथे जमीन सपाटीकरण, विकसित करताना योग्य
पद्धतीने करण्यात येत नाही. पाऊस झाला की त्याचा राडारोडा रस्त्यावर वाहून येतो. वाहतूक बंद पडते, चिखलामुळे रस्त्यावरून वाहने घसरतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तातडीने योग्य उपाययोजना करावी.’’
01113
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

