‘अंधारबन’मध्ये पर्यटकांना बंदी

‘अंधारबन’मध्ये पर्यटकांना बंदी

Published on

माले, ता. ४ : मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पट्ट्यातील पिंपरी (ता. मुळशी) येथील सुधागड अभयारण्‍यातील अंधारबन नेचर ट्रेल व कुंडलिका व्‍हॅली येथे पर्यटकांची होणारी अनियंत्रित गर्दी, अभयारण्‍य क्षेत्रातील पर्यटकांच्‍या प्रवेशामुळे वन्‍यप्राणी, तसेच वन्‍यजीव अधिवासाला हानी होत असल्‍याने दोनही पर्यटन ठिकाणे सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव गुरुवारपासून (ता. ३) पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद केली आहेत. विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात येणार आहे.
पावसाचे वाढते प्रमाण, अनिश्चित अचानकपणे होणारा मोठा पाऊस यामुळे सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव जिल्‍हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन क्षेत्रे पर्यटनासाठी बंद केली. यादरम्‍यान अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली हे पर्यटकांसाठी खुले होते. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील पर्यटकांची पावले पावसाळी पर्यटनासाठी अंधारबन, कुंडलिका व्‍हॅलीकडे वळ लागली. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्‍या वेगाने वाढू लागली. शनिवार, रविवार सुट्टीच्‍या दिवशी दोन्‍ही ठिकाणे फुल होऊ लागली.
सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव यापूर्वीच अंधारबनातील प्रवेश सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मर्यादित केला होता. परंतु, रविवारी (ता. २९) अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली येथे अचानक मोठ्या संख्‍येने पर्यटक आले. अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली येथे पर्यटकांची गर्दी झाली. वाढत्‍या पर्यटक संख्‍येमुळे कर्मचाऱ्यांना सुव्‍यवस्‍था, सुरक्षितता राखणे अवघड होऊ लागले. वाढता पाऊस, पर्यटकांची गर्दी लक्षात घेत सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव प्रशासनाने सकाळी अकरा वाजताच प्रवेश बंद करण्‍याचा निर्णय घेतला. यामुळे काही काळ गोंधळ, अनियंत्रित प्रचंड गर्दीचे वातावरण झाले. अंधारबनच्‍या या घटनेचे रील्‍स, व्हिडिओ मोठया प्रमाणात समाज माध्‍यमांवर व्‍हायरल झाले. या व्हिडीओतून अनियंत्रित गर्दीचे भयावह चित्र समोर आले. यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेची वनविभागाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. वनविभाग (वन्‍यजीव) ठाणेचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी नुकतीच अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com