मुळशी धरणात ७७ टक्के साठा
माले, ता. ८ : मुळशी धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मुळशी धरण जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ७६.६७ टक्के (१५.४५ टीएमसी) भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला. जोराच्या पावसामुळे विसर्ग वाढवत मंगळवारी (ता. ८) धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ७९०० क्यूसेक नियंत्रित विसर्ग करण्यात आला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने गरजेनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार आहे.
एरवी जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुळशी धरण ७५ टक्क्यांचा टप्पा गाठते. परंतु यावर्षी पावसाने मे महिन्यात दमदार हजेरी लावली. जून महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे धरण जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ७६.६७ टक्के भरले. धरणात १५.४५ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना मुळा नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुळशी धरण परिसरात मंगळवारी (ता. ८) सकाळी २४ तासांत नोंदवण्यात आलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात या हंगामातील एकूण पाऊस)- ताम्हिणी- ६० (३४१०), शिरगाव- ६६ (३०८०), आंबवणे- ५१ (२३७१), दावडी- ४७ (२६४०), माले-६० (१७०२), मुळशी- ६७ (१८७०).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.