एकोले येथे कुंडात बुडून पर्यटक तरुणाचा मृत्यू
माले, ता. १९ : मुळशी धरण भागातील एकोले (ता. मुळशी) येथील लोटस व्हॅली परिसरात पाण्याच्या कुंडात बुडून एका पर्यटक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी सुमारे ११. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.
आयुष उमेदलाल हरीनखेडे (रा. आंबेगाव बुद्रूक, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा आपल्या मित्रांसह फिरण्यासाठी एकोले येथील लोटस व्हॅली परिसरात आला होता. ट्रेकदरम्यान अधिक चालणे शक्य नसल्याने तिघे जण मागे थांबले, तर आयुषसह पाच जण पुढे पाण्याच्या कुंडाजवळ गेले. त्या ठिकाणी काही पर्यटक पोहत होते.
आयुष व त्याचे मित्रही पाण्याच्या बाजूच्या दगडावर बसले. त्यांच्यापैकी एक जण पाण्यात उतरला. त्यानंतर अचानक तोल जाऊन एकमेकांना सावरण्याच्या प्रयत्नात आयुषसह सर्वजण पाण्यात पडले. पाण्यात असलेल्या मित्राच्या मदतीने इतरांना बाहेर काढण्यात यश आले; मात्र आयुष दिसेनासा झाला. त्यानंतर उपस्थित पर्यटकांनी आणि मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडला नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलिस व रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबविल्यानंतर आयुषला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तत्काळ रुग्णवाहिकेतून त्याला पौड येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

