ढोकळवाडीत एसटी-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ढोकळवाडीत एसटी-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Published on

माले, ता. २ : मुळशी धरणभागातील ढोकळवाडी (ता.मुळशी) गावच्या हद्दीत पुणे-कोलाड मार्गावर सोमवारी (ता. २) दुपारी दीडच्या सुमारास एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
लक्ष्मण रामआश्रय मुखिया (वय २३, रा. राजलक्ष्मी वृंदावन सोसायटी, आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍याच्‍या मित्राने पौड पोलिसांत खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मोटारसायकलवरून मित्रांसह पुणे ते ताम्हिणी घाट अशा राईडसाठी निघाला होता. लक्ष्मण पुढे निघून गेला होता, तर त्याचे इतर मित्र मागून येत होते. बाणेर-हिंजवडी-पौड मार्गे ताम्हिणी घाटाकडे जात असताना ढोकळवाडी गावच्या हद्दीत एका वळणावर त्याची मोटारसायकल आणि एसटी बस यांच्यात धडक झाली. त्‍यात तो गंभीर जखमी झाला. तेवढ्यात त्‍याचे मित्र घटनास्थळी पोहोचले. तेव्‍हा एसटी चालकाने मोटारसायकल व बसचा अपघात झाल्याची माहिती दिली. मित्रांनी तत्काळ रस्त्याने जाणारे वाहन थांबवून त्याला उपचारासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पौड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com