

मांजरी खुर्द, ता. २७ : कोलवडी-साष्टे (ता. हवेली) येथील सुमारे दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच केले.
सरपंच विनायक गायकवाड, यशवंत कारखान्याचे संचालक रामदास गायकवाड, माजी संचालक मिलापचंद गायकवाड, जयसिंग गायकवाड, बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, पोलिस पाटील मीना गायकवाड, विकास सोसायटीचे अध्यक्ष विजय गायकवाड, उपसरपंच रमेश मदने, ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, नीलेश रिकामे, संदीप गायकवाड, स्वप्नील नितनवरे, योगेश मुरकुटे, शीतल अविनाश भाडळे, चैत्राली गायकवाड, स्वाती गायकवाड, प्रिया गायकवाड, निशा भोर, नीता भालसिंग, प्रियांका शितोळे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे आदी यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, नवीन ग्रामसचिवालय उभारणे, काकाश्री पार्क रस्ता काँक्रिटीकरण करणे, कोलवडी स्मशानभूमी संरक्षक भिंत, साष्टे स्मशानभूमी रस्ता, माऊली नगर रस्ता, साठे नगर रस्ता, साळुंखे वस्ती रस्ता करणे, जिल्हा परिषद शाळा कोलवडी व साष्टे शौचालय बांधणे, कोलवडी- मांजरी रोड चौक सुधारणा करणे, गायकवाड वस्ती शौचालय बांधणे आदी विकासकामांचे भूमिपूजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.