चोरट्यांनी रोहित्र फोडल्याने मांजरीत वीजपुरवठा खंडित

चोरट्यांनी रोहित्र फोडल्याने मांजरीत वीजपुरवठा खंडित

Published on

मांजरी खुर्द, ता. ९ : येथील (ता.हवेली) मुळा-मुठा नदी काठावरील माणिकनगर परिसरात चोरट्यांनी रविवारी (ता. ७) मध्यरात्री रोहित्र फोडले व त्यातील तारा व इतर किमती साहित्य लंपास केले. यामुळे गेली दोन-तीन दिवसांपासून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

एक महिन्यापूर्वी माणिकनगर येथील याच रोहित्राजवळील २०० के. व्ही.च्या रोहित्राची चोरी झाली होती, असे शेतकरी सतीश उंद्रे, पंडित उंद्रे, संतोष उंद्रे, राजेंद्र उंद्रे, पांडुरंग काळे, बाळासाहेब भोसले, प्रकाश सावंत आदींनी सांगितले. दरम्यान, महावितरण कंपनीला नवीन रोहित्रासाठी लागणाऱ्या निधीची नव्याने तरतूद करावी लागते. त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे येथील रोहित्र आता कधी बसेल, याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे. महावितरण कंपनी व पोलिसांना सांगूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मांजरी खुर्दच्या माणिकनगर परिसरातील ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. त्यामुळे कंपनीसह शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येथील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत केला जाईल.
- दीपक बाबर, सहाय्यक अभियंता, विद्युत वितरण कंपनी, वाघोली शाखा

00487

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.