मोरगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा

मोरगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा

Published on

मोरगाव, ता. १० : ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम व्यवस्थेचा ‘कणा’ आहे. त्यांचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी रविवारी (ता. ९) मोरगाव येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी तालुका संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी पुणे व सातारा श्रमिक ग्रामपंचायत राज्य कर्मचारी संघटना कार्यरत आहे. यासाठी तालुक्यात कार्यरत असलेल्या नवीन कार्यकारणीची नुकतीच निवड झाली. मोरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तसेच राज्य कर्मचारी संघटनेचे संस्थापक ज्ञानोबा घोणे, जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, राज्य प्रसिद्ध प्रमुख राहुल तावरे, बारामती ग्रा.पं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पिंटू सावंत, उपाध्यक्ष मयूर शेडगे, नवनाथ फाळके, पल्लवी बागव, सरचिटणीस संजय दुबेळे, आदी उपस्थित होते. यावेळी विविध प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
या पुढील काळात सर्वसामान्य व सर्व समावेशक व्यापक पद्धतीने कर्मचारी संघटना कार्यरत राहणार आहे. या कामाला अधिक गती देण्यासाठी नव्याने बारामती तालुका कार्यकारिणीत शंकर जगताप व अमोल पारसे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यावेळी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम, चर्चा, तसेच विविध विषयावर संवाद करण्यात आला. राहुल तावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.