मोरगाव येथे भुईनळे तयारीची लगबग

मोरगाव येथे भुईनळे तयारीची लगबग

मोरगाव, ता. १३ : येथील कुंभारवाड्यात दसऱ्यासाठी भुईनळे तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जवळपास या उत्सवासाठी चाळीस हजारांपेक्षा जास्त भूईनळे बनवले जातात. काम वेगाने होण्यासाठी सिंगल फेजची मोटर जोडून विजेवर भुईनळे बनवण्याचे काम हाती घेतले आहे. कुंभाराने तयार केलेल्या भुईनळ्यात शोभेची दारू भरून दसऱ्याच्या दिवशी ती उडविली जाते. श्रीमयुरेश्वराचा पालखी सोहळा आणि पालखी सोहळ्यासमोर शोभेच्या दारूची आतिषबाजी हा दसरा उत्सवातील मुख्य कार्यक्रम असतो. प्रत्येक कुटुंबामध्ये उन्हाळ्यात भुईनळ्यात शोभेची दारू भरून दसऱ्याची आतिषबाजी करण्याची तयारी उत्साहाने केली जाते. मोरगावकरांनी एकत्रित बैठक घेऊन दसरा उत्सवाचे नियोजन केले. यावेळी दसरा उत्सवांमध्ये गतवर्षीप्रमाणेच कोणत्याही प्रकारचे फटाके न उडवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मोरगावचा शाही दसरा हा मोरगावकरांचा मान असून यास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी प्रत्येक सेवेकरी व भाविक यांनी दसरा उत्सव समितीने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आव्हान यावेळी दसरा उत्सव समितीने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com