महावितरणच्या मोरगाव शाखेला नेमले सुरक्षारक्षक

महावितरणच्या मोरगाव शाखेला नेमले सुरक्षारक्षक

मोरगाव, ता. २ : ‘बिल वाढवून आलेय आणि ते लगेच कमी करून द्या’ या किरकोळ वीजबिलावरून एका महिला वीज कर्मचारी रिंकू थिटे यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना महावितरण बारामती परिमंडलात घडली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाने मोरगाव शाखा कार्यालयाला तातडीने सुरक्षारक्षक नेमले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.

मोरगावच्या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, काम करताना असुरक्षिततेची भावना तयार होत आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रांना सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना मोरगाव उपकेंद्राला तातडीने तीन सुरक्षारक्षक देण्याचे आदेश दिले. तसेच मोरगाव शाखा व उपकेंद्राला सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय, परिमंडलातील संवेदनशील उपकेंद्राची माहिती गोळा करण्याचे निर्देशसुद्धा मुख्य अभियंता पावडे यांनी दिले आहेत. सध्या मोरगाव उपकेंद्रासाठी तीन सुरक्षारक्षक नेमले असून वेळ विभागणी करून येथे सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. वास्तविक, बारामतीच्या जिरायत भागात अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा सतत विस्कळित होणे, विद्युतवाहक तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत राहणे, डीपीमध्ये फ्यूज नसणे याबरोबर काही ट्रांसफार्मर मध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होणे अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी अंतर्गत मागणी ही विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली कारण या कारणांमुळे अनेक वेळा विद्युत पुरवठा विस्कळित झाल्यानंतर कर्मचारी आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होण्याचे प्रकार घडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com