बारामतीच्या पश्‍चिम पट्‍ट्यातील वन्यप्राण्यांची भटकंती

बारामतीच्या पश्‍चिम पट्‍ट्यातील वन्यप्राण्यांची भटकंती

मोरगाव, ता. ११ : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोगवडी, तरडोली, लोणीभापकर, बाबुर्डी, मोढवे, मुढाळे, वढाणे येथील वनविभागाच्या क्षेत्रातील पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या हरणांचा विहिरीत पडल्याने व मुख्य रस्त्यावर अपघातामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहे.

सीमेवर अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या हरणावर भटकंती करणाऱ्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे त्यात हरणाचा मृत्यू झाला. वास्तविक, वनविभागाच्या क्षेत्रात लांडगा, कोल्हे, मोर, हरिण, लांडोर अशा विविध वन्यप्राण्यांचा समावेश आहे. मात्र, तीव्र उन्हाळ्यामुळे सध्या नैसर्गिक पाणवठे पूर्णपणे कोरडे ठणक पडले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. वनविभागाकडून सामाजिक संस्थांच्या मदतीने वनविभागातील पाणवठ्यात टँकरने पाणी सोडले जात आहे. वनविभागाच्या कार्यक्षेत्रास काटेरी कुंपण असावे अशी गेली अनेक वर्षापासून वन्यजीवप्रेंमींची मागणी होती. वनक्षेत्रास कुंपण नसल्यामुळे याठिकाणी वास्तव्यास असणारे वन्यप्राणी मुक्तपणे कोठेही अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतात. त्यामध्ये रात्रीच्या वेळी विहिरीत पडणे, रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसून अपघात होणे व त्यात त्यांचा मृत्यू होणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. मोरगाव विभागात वनविभागाचे पाच वनमजूर काम करतात. किमान पावसाळ्यापर्यंत कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात सातत्याने पाणी कृत्रिमरीत्या टाकावे अशी मागणी वन्यजीवप्रेमी यांच्यामधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com