ओढा खोलीकरणामुळे शाश्र्वत पाण्याचा आधार
मोरगाव, ता.२७ : बारामतीच्या जिरायत पट्ट्यात वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओढा खोलीकरण व सिमेंट बंधारे यांची कामे झाली आहेत. पावसामुळे हे ओढे व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी शाश्वत पाण्याचा मोठा आधार मिळाला आहे.
वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये साचलेला गाळ सरकारी योजना सामाजिक संस्थांची मदत याबरोबर विविध कंपन्यांचा सीएसआर फंड यातून काढण्यात आला. ओढा खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरण ही मोहीम बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात २०१४ पासून वेगाने राबविण्यात आली. सध्या जिथे शेतीसिंचनाची कोणती योजना व इतर माध्यम नाही त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये ओढा खोलीकरण व सिमेंट बंधारे झाले आहेत व आज पावसाच्या पाण्यामुळे ते बंधारे व ओढे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ओढा खोलीकरणाचा व बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचा जिरायती भागातील शेतकऱ्यांना फार मोठा आधार झाला असल्याची प्रतिक्रिया मोरगावचे शेतकरी विकास तावरे, संदीप तावरे, यशवंत तावरे, श्रीकृष्ण तावरे, दत्तात्रेय तावरे, प्रल्हाद तावरे, अशोक तावरे, विजय तावरे यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकीतून जलस्रोत बळकटीकरण व जलसंधारणाचे काम करण्याच्या उद्देशाने ओढा खोलीकरण व सिमेंट बंधारे केलेल्या सर्व यंत्रणांविषयी शेतकऱ्यांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे. ओढ्यात पाणी साचलेल्या ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरींची पाण्याची पातळी वाढली असल्याचे चित्र शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कामे सातत्याने दरवर्षी उन्हाळ्यात व्हावीत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
02373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

