तरडोली परिसरात पुरणपोळीचा नैवेद्य

तरडोली परिसरात पुरणपोळीचा नैवेद्य
Published on

मोरगाव, ता.३ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, मुर्टी येथे बळीराजाचा आवडता सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक गावांमध्ये सर्जा राजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला

प्रत्येक गावात ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर बैल जोड्या वाजत गाजत आणून त्यांची पूजा करण्यात आली व त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. शेतकऱ्यांनी मोठ्या कल्पकतेने बैलांची रंगरंगोटी व सजावट पारंपारिक पद्धतीने केली होती. मोरगाव मध्ये श्रीमयुरेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर व हनुमान मंदिर अशा तीन ठिकाणी गेली अनेक वर्षांची परंपरा अखंड जपत बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दुर्मिळ होत चाललेले हलगी वाद्याने स्वागत करून सजावट केलेल्या बैल जोड्यांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. शेती कसणारा शेतकऱ्यांना शेतीस मोठा हातभार लावणारा सर्जा राजा याची शेतकऱ्यांनी सन्मानाने पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हा सण उत्साहात साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com