खंडू खैरेवाडी येथे लांगड्याच्या
हल्ल्यात दहा बकऱ्या ठार

खंडू खैरेवाडी येथे लांगड्याच्या हल्ल्यात दहा बकऱ्या ठार

Published on

मोरगाव, ता. ९ : जोगवडी येथील गुलाब मल्हारी महानवर मेंढपाळाच्या कळपावरती खंडू खैरेवाडी येथे रात्रीच्या वेळी लांडग्यांनी हल्ला केला. यात दहा बकऱ्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पंचनामा तर मोरगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब गोडसे यांनी मृत्यू झालेल्या बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. वास्तविक गेल्या महिन्याभरात बारामतीच्या पश्चिम भागात शेळ्यांच्या व मेंढ्यांच्या कळपांवर लांडग्यांचा हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. १५ सप्टेंबरला मोरगावमध्ये वैभव संभाजी तावरे यांच्या राहत्या घराजवळील शेळ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला करून सात शेळ्यांचा फडशा पाडला होता. तर ४ ऑक्टोबरला चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात युवराज रामा मोटे यांच्या चौदा शेळ्या लांडग्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या होत्या. शेळीपालन व मेंढी पालन हा शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय आहे. चाऱ्याच्या शोधार्थ मेंढपाळ वर्ग कायम परिसरातील शेत शिवारात भटकंती करत असतात. रात्रीच्या वेळी लांडग्यांच्या हल्ल्यात शेळ्या-मेंढ्यांचा होत असलेला मृत्यू येथील मेंढपाळांचे मोठे नुकसान करणारा आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानामुळे अल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करताना शेतकरी व मेंढपाळ यांना कायम कसरत करावी लागते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडून त्वरित मदत दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वनक्षेत्र असलेल्या परिसरात वनविभागाने वन्य प्राण्यांचा उपद्रव मेंढपाळ व शेतकरी वर्ग यांना होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या व नक्षत्रात पाण्याचे टॅंक व पानवटे यामध्ये पाणी उपलब्ध आहे. मात्र, खाद्याच्या शोधार्थ वन्यप्राणी लोकवस्तीच्या ठिकाणी व शेतात भटकंती करतात. गेली अनेक वर्षांपासून बारामतीच्या पश्चिम भागात वनक्षेत्र असलेल्या परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी, जो गवडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील राजे भोसले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com