बारामती तालुक्यात टँकरला ब्रेक
मोरगाव, ता. २५ : बारामती तालुक्यात निसर्गाने दिलेली साथ आणि विविध पाणीपुरवठा योजना यामुळे मार्च सरत आला तरी अद्याप एकही टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीचा प्रस्ताव सरकार दरबारी आलेला नाही.
वास्तविक, गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासून टंचाईग्रस्त गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समिती व महसूल विभाग यांच्याकडे येतो. बारामतीच्या सर्वाधिक टंचाईग्रस्त गावांना गतवर्षी नाझरे धरणात पाणी नसल्यामुळे मोरगाव प्रादेशिक योजना अडचणीत आल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
यावर्षी धरण क्षेत्र व धरणाच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अद्याप धरणातील पाणीसाठा टिकून आहे. त्यामुळे त्या धरणावर चालणारे योजनांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेवर ११ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. याशिवाय मुर्टी प्रादेशिक योजना सुरू झाल्यामुळे त्या परिसरातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. याशिवाय लोणी भापकर प्रादेशिक योजनेमधून प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणारे पाण्यामुळे लोणी भापकर परिसरात पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
बारामती तालुक्यामध्ये ९९ ग्रामपंचायती, तर ११७ महसुली गावे आहेत. दरवर्षी किमान १५ पेक्षा जास्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण होते. याशिवाय वाड्या वस्त्यांनाही स्वतंत्रपणे पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, यावर्षी मार्च महिना सरत आला तरी अद्याप एकही टँकरची मागणी नाही. त्यामुळे बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टंचाई आराखडा व प्रतिबंधात्मक उपाय योजना यांचा योग्य ताळमेळ घालून गेली चार वर्षात केलेल्या वेगवेगळ्या जलसंधारणाच्या व जलस्रोत बळकटीकरणाच्या विविध कामांमुळे टँकरची मागणी घटली आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेतून तरडोली तलावामध्ये पाणी सोडावे व खडकवासला धरणामधून पारवडी येथील तलावात पाणी सोडावे, अशी मागणी संबंधित विभागाकडे तरडोली व पारवडी ग्रामपंचायतीकडून करण्यात आल्याची माहिती तहसील विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली. बारामती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक गावातील सद्यःस्थितीचे सर्वेक्षण करून त्यांचाही आराखडा व प्रतिबंधात्मक उपाय योजना यासंदर्भात आराखडा केला आहे.
बारामती तालुक्यात अजून एकाही गावाने टँकरची मागणी केली नाही. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे. त्यांचा एक ग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाय योजना करून कायमस्वरूपी येथील टंचाईचा प्रश्न सोडविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे
- गणेश शिंदे, तहसीलदार बारामती.
लोणी भापकर व बारामतीचा पश्चिम पट्टा यामध्ये हमखास जानेवारी महिन्यात टँकरची गरज पडते. मात्र तालुक्यात राबविलेल्या विविध योजनांमुळे या गावांच्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे सध्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.
- राहुल भापकर, माजी सदस्य, पंचायत समिती बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

