आयुष्मान कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अडचणी

आयुष्मान कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अडचणी
Published on

मोरगाव, ता. ३० : प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाकडून पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळविण्यासाठी आयुष्मान भारत हा उपक्रम सुरू आहे. हे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून आयुष्मान भारत साठी रजिस्ट्रेशन करून हे कार्ड काढले जात आहे. १०० टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनिंग दुकानदार, आशा स्वयंसेविका, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे कार्ड नागरिकांना मोफत काढून देणे बंधनकारक आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात आशा स्वयंसेविका यांच्याकडून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास ४,१००० लोकसंख्या असून २४,८७२ नागरिकांनी हे आयुष्मान भारत कार्ड काढून आपले विमा संरक्षण अबाधित केले आहे. मात्र, रेशनिंग कार्डमध्ये ज्यांची नावे ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट आहेत. ती संकेतस्थळावर आहेत, केवळ त्यांचेच आयुष्यमान भारत कार्ड साठी नोंदणी होत आहे. ते कार्ड निघत आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑफलाइन कार्ड धारकांनी केवायसी पूर्तता करून ऑनलाइन प्रक्रियेत नाव समाविष्ट केली असली तरी अद्याप ती नावे प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झाली नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड वारंवार प्रयत्न करूनही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे.


संकेतस्थळावरील पहिल्या यादीमधीलच लाभार्थी यांचे १०० टक्के आयुष्मान भारतची नोंदणी करून झालेली नाही, ती १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांचा समावेश ऑनलाइन यादीत करून त्यांचेही आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येईल.
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, बारामती

बारामती तालुक्यात केवायसी पूर्ण करून ऑनलाइन प्रक्रियेत कार्डधारकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जसे अर्ज येतील, तसे काढ धारकांचे नाव ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट केले जात आहे. वास्तविक, केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय विमा संरक्षण मिळत आहे. त्यामुळे सध्या हे कार्ड काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. संकेतस्थळावर नाव न दिसणारे नागरिक त्यातील अडचणी सोडवून आपले नाव यादीत येऊन कार्ड काढण्यासाठी कसरत करत आहेत.
- हेमंत निंबाळकर

कार्ड काढ्याचे काम सुरू आहे
मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी शिंदे व डॉ. विपलव बनकर म्हणाले, ‘‘मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून शंभर टक्के नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करून हे कार्ड काढून देण्याचे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com