जीव धोक्यात घालून प्रवासाची वेळ

जीव धोक्यात घालून प्रवासाची वेळ

Published on

मोरगाव, ता.२७ : पवारवाडी (ता. बारामती) येथे गेली चार दिवसांच्या संततधार पावस पडत आहे. यामुळे ओढे तुडुंब भरले आहेत. येथील पूल पाण्याखाली गेला असून नागरिकांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

गेली अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली पावसाळ्यात जातो. दरवर्षी येथील रस्त्यावर दुरुस्तीचे, डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने केले जाते. नागरिकांकडून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होते. मात्र अद्याप पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात कोणत्याच विभागाने येथे निर्णय घेतला नाही.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व जिल्हा परिषद यांच्याकडून या रोडचे काम करण्यात आले आहे. पवारवाडी येथे आंबी, मोरगाव वरून येणारा खटकळी ओढा तरडोली तलावाकडे जातो. पवारवाडीच्या वरच्या बाजूने पाण्याचा वेग जास्त असल्याने व ओढा दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथील पूल पाण्याखाली गेला आहे.

पवारवाडी, तुकाईनगर, मासाळ वाडी, तांबे धायगुडे वस्ती येथील नागरिकांना मोरगावला येण्यासाठी पवारवाडी येथील रोड व या पुलावरून प्रवास करावा लागतो. सध्या येथील नागरिकांना पुलावर पाणी असतानाही जीव धोक्यात घालून त्यातून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्याच्या प्रवाहात चुकून गाडीचा तोल जाऊन या ठिकाणी अपघाताचा धोकाही संभवतो.
संबंधित विभागाने या ठिकाणी पाहणी करून येथील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश पवार, बाबासो पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, शरद पवार, प्रकाश पवार, विठ्ठल पवार, मोहन पवार यांनी केली आहे.

02865

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com