वीज चोरीप्रकरणी मोरगावात एकावर गुन्हा
मोरगाव, ता. ८ : मोरगाव (ता. बारामती) येथे व्यवसायाच्या ठिकाणी अधिकृत मीटर कायमस्वरूपी बंद असताना अनधिकृतपणे विजेची चोरी केल्याप्रकरणी येथील संजय माधव तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकातील रघुनाथ नाथ्याबा गोफणे (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार हे कारवाई करण्यात आली.
वीजग्राहक अनधिकृतपणे व बेकायदा कनेक्शन घेऊन महावितरण कंपनीची वीज वापरत होता. त्यामुळे महावितरण कंपनीला आर्थिक नुकसान होत होते. तावरे यांनी ७३४४ वापरलेल्या युनिटचे वीजबिल एक लाख ७४ हजार ७०६ रुपये असे आहे व तडजोड रक्कम २० हजार रुपये अशी आहे. हे बिल ग्राहकास भरण्याबाबत कळविण्यात आले होते व दोन्ही बिल अद्याप ग्राहकाने भरलेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करून करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास मोरगाव पोलिस मदत केंद्राचे राहुल भाग्यवंत करत आहे.