कऱ्हामाई प्रवाहित झाल्याने पिकांना शाश्वत आधार
मोरगाव, ता. १० : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात कऱ्हामाई अनेक वर्षानंतर प्रथमच खरीप हंगामात प्रवाहित असल्यामुळे पिकांना मोठा आधार झाला आहे. मॉन्सून पूर्व पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामामधील बाजरी, कांदा, ऊस, भाजीपाला, कडधान्य, चारा पिके याचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नदीच्या दोन्ही बाजूच्या एक किलोमीटर अंतरावरील समाधानकारक पाणी आहे. नदींचीही पाणी पातळी वाढली आहे. नाझरे पाटबंधारे विभागाचे आंबी माळवाडी, आंबी जगताप वस्ती, मोरगाव,तरडोली, बाबुर्डी अंतर्गत साळूबाडोह व ढोपरे मळा असे सहा बंधारे आहेत. तर बारामती पाटबंधारे विभाग व जलसंधारण विभाग यांचे १४ बंधारे आहेत.
जिरायती पट्ट्यात शाश्वत पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेतले जाते मात्र खरीप व उन्हाळी हंगाम हा पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. मात्र सध्या नदी प्रवाहित असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना जगविण्यासाठी हक्काचा आधार मिळाला आहे.
नाझरे जलाशय १०० टक्के भरल्यामुळे धरणांमधील अतिरिक्त पाणी नदीत सोडले आहे. या नदीवर २० बंधारे आहेत मात्र नियमानुसार १५ ऑक्टोबर नंतर बंधारे अडविले जातात. त्यामुळे नदीवरील बंधाऱ्यांचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढण्यात आले आहेत.
नदीकाठच्या शेतकऱ्यांना जानाई शिरसाई, पुरंदर उपसा दोन्ही योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे नदीवरील बंधारे यांचाच शाश्वत आधार आहे. त्यामुळे सध्या नदी प्रवाहित असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामा मधील पिकांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी उत्साह आहे.
शेरेवाडी, बाबुर्डी येथील रोपवाटिकांना नदी प्रवाहित असल्याचा चांगला फायदा मिळत आहे.
नदीला पाणी असल्यामुळे यावर्षी खरीप हंगामामधील पिकांना चांगला फायदा होत आहे. पावसाने ताण दिला तर पाटबंधारे विभागाने बंधारे अडविण्याचा विचार करावा, अशी मागणी नदीकाठचे शेतकरी किसन भापकर, सुभाष भापकर, राजेंद्र गाडे, सुभाष वाघ, सुरेश वाघ, मनोहर वाघ यांनी केली आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थितीत पाणी शिरू नये यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बंधारे चे ढापे सध्या काढण्यात आले आहेत. नदीचा प्रवाह चालू आहे . मोरगाव भागात सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडतो. पावसाने ताण दिला तर वरिष्ठांच्या सूचनेनुसार मुदतपूर्व बंधारे अडविण्याचा विचार निश्चित केला जाईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभागाची भूमिका निर्णयात्मक असेल.
- गणेश गायकवाड, शाखा अभियंता नाझरे पाटबंधारे विभाग.
02998
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.