‘एनजीओ समिती’च्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांचे बळकटीकरण
मोरगाव, ता. १५ : ‘राज्यातील मोडकळीस आलेल्या व कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या स्वयंसेवी संस्था यांच्या बळकटीकरणासाठी ‘एनजीओ समिती’च्या माध्यमातून सक्रियपणे काम करणार आहे’, अशी माहिती राज्याचे ‘एनजीओ समिती’चे अध्यक्ष डॉ. युवराज येडुरे यांनी दिली.
बारामती येथे १२ जुलैला पुणे विभागातील संस्थांसाठी आयोजित कार्यशाळा पार पडली. यावेळी महाराष्ट्र एनजीओ समितीचे अध्यक्ष डॉ. युवराज येडुरे, उपाध्यक्ष सुनीता मोडक, राज्य सदस्य कल्याणी मोडक-कुलकर्णी, राज्यतज्ञ सारिका आटोळे, पुणे विभागीय अध्यक्ष अश्विनी कसबे, उपाध्यक्ष कांता राठोड, राजाभाऊ भिलारे, सागर आवटे, राजेंद्र बरकडे, संभाजी माने, हनुमंत लोंढे उपस्थित होते. सूत्रसंचालन महाराष्ट्र एनजीओ समितीचे सदस्य अश्विनी कुमार पतकी यांनी केले. उपस्थितांचे आभार राज्य तज्ञ सारिका आटोळे यांनी मानले.
‘जवळपास २७०० संस्था महाराष्ट्र एनजीओ समितीशी संलग्न आहेत. पुणे विभागात ३४०० कोटींचा सीएसआर निधी वितरित करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, स्वखर्चाने कार्यरत असणाऱ्या असंख्य संस्थांना केवळ परिपूर्ण माहिती नाही, दिशादर्शक रस्ता नाही, कागदपत्रांची पूर्तता नाही, अशा अवस्थेत असल्याने त्या आर्थिक बळकटीकरण, सक्षमीकरण व सीएसआर निधीपासून वंचित आहेत. त्यामुळे या संस्था बळकट करण्यासाठी समितीच्या माध्यमातून पाठबळ देणार आहे’, अशी माहिती डॉ. येडुरे यांनी दिली.
‘स्वयंसेवी संस्थांना सक्षम करणे, प्रशिक्षण देणे, ऑनलाइन कार्यप्रणालीची, आवश्यक सर्टिफिकेटची माहिती देणे, आदी काम समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संघटन शक्तीच्या माध्यमातून संस्था बळकटीकरणासाठी एकाच छताखाली काम केले करण्यात येणार आहे’, असे एनजीओ समितीच्या राज्याच्या उपाध्यक्ष सुनीता मोडक म्हणाल्या.
‘परिपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या आहेत. तर, काही ‘सीएसआर’पासून वंचित आहेत. त्यामुळे यापुढील काळात अशा संस्थांना कायदेशीर नियमावलीप्रमाणे संस्था कार्यरत ठेवणे, ‘सीएसआर’ मिळविणे व संस्था सक्षम बनवणे यासाठी सामाजिक बांधिलकी जपत काम करण्यात येणार आहे’, अशी माहिती बारामतीमधील ‘महाराष्ट्र एनजीओ समिती’च्या राज्य तज्ज्ञ सारिका आटोळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.