महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व!

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व!

Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात स्थैर्य, स्पष्टवक्ता आणि वक्तशीरता या त्रिसूत्रीवर आधारलेला नेता शोधायचा असेल, तर नाव घेता येईल ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.
- सौ. रोहिणी संदीप कदम (ढोले)
B.Sc., B.Ed., M.Ed., GDC\&A, Ph.D. (Appr.)
अध्यक्ष – एस.एम.के. फाउंडेशन, मोरगाव, ता. बारामती ‎

गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात मोलाचा वाटा उचलणारे दादा यांचे नेतृत्व आजही जनतेच्या मनावर ठसा उमटवते आहे. त्यांच्या कार्यशैलीतील शिस्त, कामाच्या वेगाने घेतलेले निर्णय, आणि मंत्रालयातील घड्याळांनाही वेळेवर चालायला लावणारी त्यांची कार्यक्षमता यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतो आहे.

राजकीय कारकीर्दीचा ठसा
अजितदादांनी १९८२ मध्ये बारामतीहून राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत दादांनी जिल्हा परिषद ते उपमुख्यमंत्रिपदाचा प्रवास नेटाने पार केला आहे. विधानसभेवर सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दादांनी सिंचन, ग्रामीण विकास, अर्थखाते अशा अनेक खात्यांत प्रभावी कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे ते एकमेव नेता आहेत. ही गोष्टच त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा दाखला आहे.

नेतृत्वातील विशेष गुणधर्म
दादांची एक खासियत म्हणजे ‘सपष्टपणे नकार किंवा होकार देणे’ कुणाचेही काम असो, जर शक्य नसेल, तर ते वेळ वाया घालवत नाहीत. कारण त्यांच्या मते, ‘ना तुमचा वेळ वाया जावा, ना माझा.’ अशा प्रामाणिकपणाने लोकसेवा करणारे फार थोडे राजकारणी आज अस्तित्वात आहेत.
कृषी, शेतकरी, सहकार, जलसंधारण याबाबतीत त्यांची कळकळ वाखाणण्याजोगी आहे. ग्रामीण भागातील योजनांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी स्थानिक विकासासाठी मोठा निधी खेचून आणला आहे.

सामाजिक भान आणि आपुलकी
जुलै २०२३ मध्ये बारामती तालुक्यातील मोरगाव येथील काही युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी अजितदादांची भेट घेतली. प्रत्येकाशी सविस्तर संवाद साधत त्यांनी प्रत्येकाची कामे समजून घेतली व त्यावर तत्काळ मार्गदर्शन केले. ‘लोकांबद्दलची ही आत्मीयता’ – हेच त्यांचे खरे नेतृत्व आहे.

आजच्या पिढीसाठी आदर्श
राजकारणात नवीन पिढी येत आहे. मात्र, केवळ लोकप्रियता नव्हे, तर ‘कर्तव्यनिष्ठा आणि स्पष्टता’ हीच खरी गरज आहे. दादांसारखा नेता नव्या पिढीला एक अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी वेळेचे, प्रशासनाचं आणि संसाधनांचं व्यवस्थापन कसे करावे, याचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे.

जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य
आजच्या धकाधकीच्या राजकारणात ज्येष्ठतेला प्रतिष्ठा असूनही, अजितदादांनी आजवर कधीही अहंकार न बाळगता ‘जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं’ अशा नेता जर देशपातळीवर निर्णय घेणाऱ्या भूमिकेत आला, तर नक्कीच परिवर्तन घडून येईल – हे निःसंशय!
दादा, आपली कार्यपद्धती नव्या युगाच्या नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या बिनधास्त, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे – आणि तुम्ही ती गरज पूर्ण करत आहात!


03014

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com