कऱ्हावागज सोसायटी अध्यक्षपदी नाळे
मोरगाव, ता. ३ : कऱ्हावागज (ता. बारामती) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बापूराव नाळे, तर उपाध्यक्षपदी संगीता खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष दत्तात्रेय गावडे व उपाध्यक्ष माणिकराव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मंगळवारी (ता. २) सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी बारामती कार्यालयामध्ये निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी एक एक अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बंडगर यांनी नाळे यांची अध्यक्षपदी तर खोमणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. या वेळी बारामती तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा संचालक पोपट गावडे, संतोष नाळे, शंकर नाळे, नवनाथ नाळे, अप्पासो सांगळे, विमल गावडे, संपत गावडे, सागर खोमणे, तेजमल गुजराणी, अजित जाधव, सागर खरात, सोसायटीचे सचिव देविदास भापकर, सहसचिव महेश नाळे आदी उपस्थित होते.