

मोरगाव, ता. २ : लोणी भापकर (ता. बारामती) येथील ग्रामसेविकेविरोधात सुरू असलेले आंदोलन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर सोमवारी (ता. १) मागे घेण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले आहे की, आचारसंहिता संपल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उज्ज्वला शिंगाडे यांनी दमदाटी केल्याचा आरोप करून आंदोलनकर्ते मनोज साठे यांनी २६ नोव्हेंबरपासून लोकशाही मार्गाने शांततेतून आंदोलन सुरू केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की पुढील कारवाईवर लक्ष ठेवले जाईल.
यावेळी आंदोलनकर्ते मनोज साठे, माजी सरपंच विजय बारवकर, उद्योजक संदीप पवार, सुनील बारवकर, बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे, विशाल भापकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून घटनेची माहिती दिली व कारवाई करण्याचे आश्वासन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.