सुसंवादाने सोडविला वादातील रस्त्याचा प्रश्न
मोरगाव, ता. ७ : तरडोली (ता. बारामती) अंतर्गत पवारवाडी येथे शनिवारी (ता. ३) पवारवाडी ते पाण्याची टाकी व गट नंबर ३७८कडे जाणाऱ्या रस्त्याचा मागील काही दिवसांपासून सुरू असलेला वाद, संवादाने मिटवून पुढील उपाययोजनांची चर्चा करण्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले.
स्थानिक अडचणी, समन्वय सुसंवादाच्या अभावामुळे या रस्त्याचा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या रस्त्यावरील पाऊण किलोमीटरचे काम मंजूर होते. बाकी काम करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. मात्र, या ठिकाणी वादामुळे व अतिक्रमणामुळे काम होऊ शकले नव्हते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा तोंडी समज देऊनही हा प्रश्न प्रलंबित होता. मोरगावच्या मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे व ग्राम महसूल अधिकारी दिगंबर घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी संबंधित ग्रामस्थांशी त्यांनी समन्वय सुसंवाद करून चर्चा करत मार्ग काढला. तसेच, अडवलेला रस्ता व रस्त्यावरील अतिक्रमण सर्वांसमोर दूर करून सर्व शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करून देण्यात आला.
याप्रसंगी मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे, तरडोलीचे सरपंच महेंद्र तांबे, ग्राम महसूल अधिकारी दिगंबर घोरपडे, पोलिस पाटील बाळासाहेब जाधव, पवारवाडी सर्व शेतकरी उपस्थित होते.
वादामुळे काहीच निष्पन्न होत नाही. सामोपचाराने आहे या वस्तू स्थितीवर मार्ग काढणे महत्त्वाचे असून नागरिकांनी वहिवाटीचे रस्ते खुले करताना सहकार्य करावे.
- प्रमिला लोखंडे, मंडल अधिकारी, मोरगाव
03444
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

