मोरगावात तरुणाची धावत्या टेम्पोखाली उडी
मोरगाव, ता. १८ : येथील मुख्य चौकातील पोलिस मदत केंद्रासमोर बुधवारी (ता. १८) सकाळी साडेसातच्या सुमारास एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या टेम्पोखाली उडी मारली. टेम्पोच्या मागील चाकाखाली डोके चिरडले गेल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या टाटा ११०९ टेम्पोच्या (क्र. नमूद नाही) मागील चाकाखाली या युवकाने अचानक उडी घेतली. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोरगाव येथील दत्तात्रेय भगवान नेवसे यांनी या घटनेची माहिती पोलिस मदत केंद्रात दिली. मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत युवकाचे वर्णन : अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे, सडपातळ बांधा, दाढी वाढलेली. अंगात भगव्या रंगाचा टी-शर्ट (ज्यावर ''बोल बम'' लिहिले आहे), चॉकलेटी नाईट पँट, राखाडी जर्किन आणि काळे बूट आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या उजव्या हातावर ''माधुरी'' असे नाव गोंदलेले आहे. या युवकाबाबत काही माहिती असल्यास सुपे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास मोरगाव पोलिस मदत केंद्राचे हवालदार राहुल भाग्यवंत करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

