काऱ्हाटीत ‘अनंत-आशा’ अभ्यासिका सुरू
मोरगाव, ता. १९ : कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी (ता. बारामती) यांच्या वतीने काऱ्हाटी संकुलामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित आशा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ ‘अनंत-आशा’ ही आधुनिक व सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांच्या स्वतःच्या परिसरातच करता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांचे स्वप्न होते की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सक्षमपणे उभे राहावेत. पवार यांची ही दूरदृष्टी आणि विद्यार्थ्यांविषयीची बांधिलकी लक्षात घेऊन ‘अनंत-आशा’ ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, शांत व अभ्यासास पूरक आणि केवळ अभ्यासासाठी आवश्यक जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी व पालकांना आव्हान करण्यात येत आहे की, सर्वांनी या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

