मूर्टीच्या क्षितीजा जगदाळेचे सीए परीक्षेत यश

मूर्टीच्या क्षितीजा जगदाळेचे सीए परीक्षेत यश

Published on

मोरगाव, ता. ६ : मुर्टी (ता. बारामती) येथील क्षितीजा संग्रामसिंह जगदाळे हिने चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) परीक्षेचा अंतिम टप्पा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तसेच बी. कॉम पदवी एकाच वेळी यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या गावाचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.

कठोर परिश्रम, चिकाटी, सात‌त्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या बळावर क्षितिजाने हे दुहेरी यश संपादन केले. शिक्षणाबाबत तिची असलेली निष्ठा, वेळेचे अचूक नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच तिला पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश मिळाले.
तिने सीए ची फायनल परीक्षा देत असतानाच बी. कॉम पदवीही मिळवली. सोशल मीडियापासून लांब राहून सीए होण्याचे ध्येय समोर ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून क्षितिजाने आपल्या जिद्‌दीचे व मेहनतीचे क्षितिज गाठले आहे.

कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा, मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रामाणिक मेहनत यामुळे हे यश शक्य झाल्याचे क्षितिजाने सांगितले.
क्षितिजा जगदाळे हिच्या ह्या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, ‘मेहनत आणि जिद्‌द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही’ हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे. ग्रामीण भागात व शेतकरी कुटुंबातील क्षितिजाने गावासह परिसरातून कौतुक होत आहे.
मुर्टी गावासाठी ही अभिमानाची बाब असून, तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com