काऱ्हाटीत सलग ३० तास कौशल्य प्रात्यक्षिक

काऱ्हाटीत सलग ३० तास कौशल्य प्रात्यक्षिक
Published on

मोरगाव, ता. ९ : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका वेगळ्या, कृतीप्रधान आणि भावपूर्ण पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कृतीतून श्रद्धांजली’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत आय.टी.आय. विभागातील एकूण १०० विद्यार्थी व १४ शिक्षक- कर्मचारी यांनी एकत्रित सहभाग नोंदवत सर्वात जास्त काळ सतत ‘बहु-व्यापार कौशल्य’ प्रात्यक्षिके (Longest Continuous Multi Trade Skill Demonstrations) या संकल्पनेअंतर्गत सलग दिवस-रात्र अशा तब्बल ३० तास विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. विशेष म्हणजे, या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, या ३० तासांच्या सलग कौशल्य सादरीकरणाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या या प्रयत्नाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
यावेळी श्रद्धांजली ही केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता ती कृतीतून व्यक्त व्हावी, या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. हा उपक्रम उपमुख्यमंत्री तथा संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, तसेच विश्वस्त पार्थ अजित पवार (राज्यसभा खासदार, भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रफुल्ल तावरे यांनी दिली.
या उपक्रमामध्ये स्वप्नील काळभोर, केतन तांबे, अश्विनी भिसे, अनुजा हाके, सायली एकतपुरे, विशाल मदने, बाबासाहेब खंडाळे, राजेंद्र मदने, अक्षय तावरे, राहुल जाधव, अभिजित पवार, महेश गायकवाड, सुषमा जाधव व सोनाली जमदाडे या निदेशकांनी विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच, या उपक्रमासाठी निरीक्षक म्हणून महेश चांदगुडे व नवनाथ सिरसट यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण स्वप्नील धुमाळ व प्रतीक कांबळे यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कर्तव्यभावना आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली असून, कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक प्रेरणा मिळाली असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी विकास निर्मळ यांनी दिली.

03549

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com