कुटुंबाच्या विकासासाठी महिला सक्षमीकरण महत्त्वाचे ः चव्हाण

कुटुंबाच्या विकासासाठी महिला 
सक्षमीकरण महत्त्वाचे ः चव्हाण
Published on

मोरगाव, ता. २८ : ‘‘कुटुंबाच्या विकासासाठी महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे असून, प्रत्येक महिलेने सक्षम होण्याचे ध्येय ठेवून कार्य करावे,’’ असे प्रतिपादन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण यांनी केले.
तरडोली (ता. बारामती) येथे आयोजित ‘नव-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’च्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणात ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) २३ व २४ मार्च २०२६ रोजी लोक संचलित साधन केंद्र कार्यकारिणी समिती सदस्यांसाठी हे निवासी प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये प्रशासकीय, आर्थिक व्यवस्थापन आणि संनियंत्रण पद्धतींबाबत ४५ सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून २१०३ बचत गट कार्यरत असून, त्याद्वारे २५ हजार ३४० महिला जोडल्या गेल्या आहेत. महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी २१ उपप्रकल्प राबवले जात आहेत. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, भोर, बारामती, इंदापूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे लोक संचलित साधन केंद्रे कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रशिक्षणाचा समारोप महिलांची ओटी भरून पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण, सतीश भारती, आशिष दगडे यांनी मार्गदर्शन केले. सतीश भारती यांनी सूत्रसंचालन केले, तर आशिष दगडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com