कळंबच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे संतोष भालेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबच्या उपसरपंचपदी 
राष्ट्रवादीचे संतोष भालेराव
कळंबच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे संतोष भालेराव

कळंबच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे संतोष भालेराव

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ६ : कळंब (ता. आंबेगाव) येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष ऊर्फ गोकूळ भालेराव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एम. एम. भोईर यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी आदिशक्ती कमलजादेवी महाविकास आघाडीच्या उषा सचिन कानडे विजयी झाल्या होत्या. तर आदिशक्ती कमलजादेवी ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा मिळविल्या होत्या. उपसरपंचपदासाठी संतोष भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी मावळत्या सरपंच राजश्री भालेराव, सरपंच उषा सचिन कानडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय गंगाधर कानडे, ज्योती नीलेश येवले, रश्मी योगेश मोरे, नितीन बाळू भालेराव, गुलाबबाई दिलीप कानडे, कमलेश रोहिदास वर्पे, जयश्री मंगेश भालेराव, अंजली बाळू भालेराव, रेश्मा भाऊ काळे, केतन किसन कहडणे, महेंद्र अशोक पारधी, निर्मला नितीन थोरात उपस्थित होत्या.
नवनिर्वाचित उपसरपंच संतोष भालेराव यांचा सन्मान माजी सभापती वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती उषा कानडे, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, अनिल कानडे, नीलेश कानडे, दत्ता वर्पे, विष्णू कानडे, रोहन कानडे, सचिन कानडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
“गावात एकोपा निर्माण व्हावा म्हणून महाविकास आघाडी पॅनेलने उपसरपंच निवडणुकीत उमेदवार उभा केला नाही,’’ असे महाविकास आघाडी पॅनेल प्रमुख नितीन भालेराव यांनी सांगितले.