महाळुंगे येथील बंद घरातून
संसारोपयोगी साहित्य चोरी

महाळुंगे येथील बंद घरातून संसारोपयोगी साहित्य चोरी

महाळुंगे पडवळ, ता. २० : घोडेकरमळा-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे बंद घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ३६ हजार रुपये किमतीची जेवणाची भांडी व संसारोपयोगी साहित्य चोरून नेले.
महाळुंगे पडवळ येथे संजीव शंकरराव पाटील यांचे ‘राजभवन फार्म हाउस’ आहे. ते कुटुंबासमवेत मुंबई येथे वास्तव्यास आहेत. रविवारी (ता. २०) सकाळी आनंद दिनकर गभाले हे फार्म हाउसवर गेले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. संजीव पाटील यांचे चुलत बंधू दिलीप लक्ष्मण सैद यांना चोरीचा प्रकार कळविल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी आले. त्यावेळी घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. दोन कुकर, फ्राय पॅन, तीन किटली सेट, भाजी कापण्याच्या ६ सुरी, लेट्स सेट, ओव्हन डिश, ग्रीलर, दोन कापडी शाल, ४ बेडसीट, चार चटई आदी ३६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. याबाबत दिलीप सैद यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com