बिबट्याच्या हल्ल्यात चासमध्ये शेळी-मेंढी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात
चासमध्ये शेळी-मेंढी ठार
Published on

महाळुंगे पडवळ, ता. २८ : चास (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कडेवाडीत सोमवारी (ता. २७) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व लहान मेंढी ठार झाली.
चास-कडेवाडी येथे शेतकरी बाळासाहेब चासकर व सुदाम चासकर यांच्या शेतात मेंढपाळ अण्णा कोळपे यांनी शेळ्या व मेंढ्यांचा वाडा मुक्कामी होता. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून शेळी व लहान मेंढी ठार केली. त्यात मेंढपाळाचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाळासाहेब चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वनपाल शशिकांत मडके व वनसेवक काशिनाथ काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी माजी उपसरपंच संतोषकुमार चासकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वाडीवस्तीवर ऊस तोड सुरु झाली आहे. त्यामुळे बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. शेळ्या, पाळीव कुत्री, मेंढ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच अर्चना दौलत बारवे व उपसरपंच कविता सतीश चासकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com