आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात जोरदार पाऊस

आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात जोरदार पाऊस

महाळुंगे पडवळ, ता. १० : आंबेगाव तालुक्यात कळंब, महाळुंगे पडवळ, लौकी, चांडोली बुद्रूक येथे अवकाळी पावसाने शुक्रवार (ता. १०) दुपारी तीनच्या दरम्यान जोरदार हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी, वीट भट्टी व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक व शेतकरी यांची माल झाकण्यासाठी धांदल उडाली. पावसाने बाजरी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
कळंब, एकलहरे, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, महाळुंगे, चास आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस अर्धा तास चालू होता. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी जमा झाले होते. यामुळे बाजरी, कांदा पीक झाकण्यासाठी शेतकरी बांधवांची मोठी धावपळ उडाली होती. कांदा, बाजरी पीक भिजल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार आहे.
पावसाने बाजरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वीट भट्टी व्यावसायिक सुद्धा अचानक आलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त झाले होते. अचानक येणाऱ्या पावसाने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असते. पुणे नाशिक रस्त्याने सुद्धा सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणावर सुरू होता. त्यामुळे दुचाकी चालकांची सुद्धा मोठी धांदल उडाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com