कुंपणाला खड्डा करून
बिबट्याचा गोठ्यात प्रवेश

कुंपणाला खड्डा करून बिबट्याचा गोठ्यात प्रवेश

Published on

महाळुंगे पडवळ, ता. ५ : आंबेगाव तालुक्यात महाळुंगे पडवळ व कळंब येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनुक्रमे कालवड आणि शेळी ठार झाली. शनिवारी (ता. ५) पहाटे सदर घटना घडली.
कळंब येथे सुभेमळा परिसरात सुनील पारधी यांचा चार शेळ्यांचा गोठा घराजवळ आहे. सभोवताली गोठ्याला तारेचे कुंपण आहे. बिबट्याने शक्कल लढवून गोठ्याच्या बाजूने खड्डा करून थेट गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यातील शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. शेळ्या जोरात ओरडल्याने बिबट्याने हल्ला केल्याचे पारधी यांच्या लक्षात आले. त्यांनी बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभागाला कळविली. वनरक्षक संपत तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्याचे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाळुंगे पडवळ-फुलेवाडी येथे शुक्रवारी (ता. ४) रात्री बिबट्याने सोपान किसन बनकर यांच्या कालवडीवर हल्ला केला. त्यात कालवड ठार झाली. शेतकऱ्याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वनरक्षक रईस मोमीन आणि वन मजूर काळूराम गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. पंचक्रोशीत बिबट्याचा नेहमीच वावर आहे. अनेकांना बिबट्याने रात्री दर्शन दिले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com