कालव्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
महाळुंगे पडवळ, ता. २५ : चास-ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात मोटार कोसळली होती. त्यात बेपत्ता झालेल्या वैभव सुरेश मोरे (वय २८, रा. नारोडी, ता. आंबेगाव) यांचा मृतदेह मंगळवारी (ता. २५) सकाळी कालव्यात सापडला आहे.
नारोडी येथून वैभव मोरे व मित्र प्रवीण रामभाऊ घाणेकर (वय २३) हे दोघे एम. एच. ०४, एच. यु. ११६० या मोटारीतून चास- ठाकरवाडी रस्त्याने गिरवली गावाकडे जात होते. कोंबडवाडी वस्तीवरील वळणावर ताबा सुटल्याने मोटार थेट डाव्या कालव्यात कोसळली होती. दरवाजा उघडून प्रवीण घाणेकर पाण्यातून बाहेर आल्याने बचावले होते. त्यानंतर स्थानिकांनी मोटार पाण्याबाहेर काढली. मात्र, मोरे मात्र बेपत्ता झाले होते. परिसरात शोध घेतला असता ते सापडले नाहीत. डाव्या कालव्याला ५५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. शोधकार्यात अडथळा येत असल्याने कुकडी पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी केले होते.
मंगळवारी (ता.२५) सकाळी घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर भटवाडी-तोडकरमळा परिसरातील डाव्या कालव्यात एका खांबाला मृतदेह अडकलेला पोलिस पाटील वैभव तान्हाजी शेगर यांना दिसला. त्यांनी तत्काळ घोडेगाव पोलिसांना माहिती दिली. अक्षय बारवे, वैभव शेगर व अर्जुन काळे यांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढला. हवालदार विठ्ठल वाघ, एस. डी. कोरके यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घोडेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विठ्ठल वाघ तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

