टोकेवाडीत चार दिवसांत दुसऱ्यांदा बिबट्याचा हल्ला
महाळुंगे पडवळ, ता. २५ : टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. २५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोठ्यात बिबट्याने हल्ला करून कोंबड्या फस्त केल्या. गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
टाकेवाडी येथे शंकर खंडू चिखले यांचा घरापासून १०० मीटर अंतरावर २० गाईंचा गोठा आहे. त्यामध्ये ८ कोंबड्या आहेत. सभोवताली साडेसहा फूट उंच संरक्षक भिंत आहे. बिबट्याने मंगळवारी पहाटे संरक्षक भिंतीवरून उडी मारून गोठ्यातील एक कोंबडी फस्त केली. तर, लक्ष्मण बबन चिखले यांच्या गोठ्यातील ५ कोंबड्या फस्त केल्या. पोलिस पाटील उल्हास चिखले यांनी बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभागाला दिली. पाटीलवस्ती येथे बिबट्याने कोंबड्या फस्त करण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी हतबल झाले आहेत. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

